श्रीरामपूर / प्रतिनिधी :- कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेंतर्गत येत असलेल्या गोंडेगावच्या शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या गायींचे अनुदान मिळत नसल्याने तालुका कृषी अधिकार्यांच्या बेजबाबदारपणाच्या निषेधार्थ दि. १२ फेब्रुवारी रोजी गांधी पुतळ्यासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या म्हटले आहे, की कोरडवाहू कृषी विकास क्षेत्र योजनेअंतर्गत गायी खरेदीसाठी आमची निवड केली. त्याअनुषंगाने आपले पत्र व तोंडी आदेशाने आळेफाटा येथील बाजारात गायी खरेदी केल्या. येत्या आठ दिवसांत सदरचे अनुदान न दिल्यास आमरण उपोषणास करणार असल्याचे चंद्रकांत फोपसे, बाळासाहेब फोफसे, दगडू चौधरी, काशिनाथ शेलार, नवनाथ म्हैस आदी लाभार्थी शेतकऱ्यांनी सांगितले.
गायींच्या अनुदानासाठी उपोषणाचा इशारा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:45
Rating: 5
Post Comment