Breaking News

विनोद गोएंका यांच्या भावाचे अपहरण


मुंबई : डी बी रिऍलिटी या प्रसिद्ध बांधकाम कंपनीचे मालक विनोद गोएंका यांच्या भावाचे आफ्रिकेतील मोझांबिका येथे अपहरण करण्यात आले आहे. आफ्रिकेतील टोळीने त्याचे अपहरण केले असून विनेद गोएंका यांनी याबाबत परराष्ट्र मंत्रालयाला माहिती दिली आहे. अपहरणकर्त्यांनी प्रमोद यांच्या एका मित्राला फोटो पाठवून याबाबतची माहिती दिल्याचे समजते. प्रमोद गोएंका हे ज्वेलरी व्यवसायात असून मोझांबिका येथील एका गुजराती व्यावसायिकाची भेट घेण्यासाठी ते गेले होते. शनिवारपासून प्रमोद गेएंका यांच्याशी संपर्क होत नव्हता. मात्र अपहरणकर्त्यांनी त्यांच्या कैदेतील प्रमोद गोएंका यांचे छायाचित्र गोएंका कुटुंबीयांपर्यंत पोहोचवले आणि हा प्रकार समोर आला. प्रमोद हे कोठारी नामक व्यावसायिक ाची भेट घेण्यासाठे गेले होते.ते दोघे एका हिरेव्यापाऱयाला भेटणार होते.आता प्रमोद गोएंकासह कोठारी देखील बेपत्ता झाल्याने त्याचेही अपहरण झाल्याची शक्यता आहे.