Breaking News

लोणार तालुक्याची हागणदरी मुक्तीकडे वाटचाल

बुलडाणा, दि. 03, सप्टेंबर - लोणार तालुक्यामध्ये लोणार पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशन  अंतर्गत हागणदारीमुक्त अभियान राबविण्यात येत असून पंचायत समिती स्तरावरील गुड मॉर्निंग पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
या पथकाचे प्रमुख विस्तार अधिकारी माधव कोकाटे, एस पी ठोके, सहायक गटविकास अधिकारी गजानन पाटोळे असुन सदस्यामध्ये सागर शेळके, भाग्यवंत,  श्रीकृष्ण वाळूकर, तेजनकर, बी. टी. डव्हळे, के. एल. शिंगणे, हे कर्मचारी सदस्य म्हणून काम पाहतात. प्रत्येक गावामध्ये हे पथक भेट देत असुन गावातील सरपंच,  ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, व इतर ग्रामपंचायत कर्मर्‍यांच्या मदतीने गावातील लोकांचे प्रबोधन करण्याबरोबरच टमरेल बहाद्दरावर कार्यवाही करण्यासाठी  योग्य ती पावले उचलत असुन त्यांच्या या प्रयत्नांचे फलित तालुक्यातील बहुतांशी गावे शौचालययुक्त होतांना दिसत आहे. उघडयावर शौचास बसणार्‍यांना गुलाब पुष्प  देऊन उघडयावर शौचास बसणे आरोग्यास किती हानिकारक आहे हे पटवुन दिले जात आहे. तालुक्यातील ग्राम चिखला येथे मा. गटविकास अधिकारी स्मिता पाटील  यांनी मार्गदर्शन सभा घेतल्यामुळे ग्रामस्थामध्ये एवढे परिवर्तन झाले की या गावामध्ये प्रत्येक घरी शौचालय उभारण्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले. त्यामुळे  लवकरच हे गाव हागणदारीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. बर्‍याच गावातील लोकांकडे घरी शौचालय असुनसुद्धा उघडयावर शौचास जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात  आढळून येत होते. अश्या लोकांना कार्यवाहीचा बडगा दाखवताच शौचालयाचा वापर सदर लोकांकडून सुरु करण्यात आला. लोणार तालुका लवकरात लवकर  हागणदारीमुक्त होण्यासाठी विस्तार अधिकारी माधव कोकाटे, एस पी ठोके, गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय तळमळीने कार्य  करताना दिसत आहे. अगदी सकाळीच गुड मॉर्निंग पथक गावागावामध्ये पोहचून मेगा फोनद्वारे ग्रामस्थांना उघडयावर शौचास जाण्यापासून परावृत्त करतांना मोठी  मेहनत घेत आहेत. आतापर्यंत गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातुन 202 लोकावर दंडात्मक करण्यात आली असुन जे लोक शौचालय असुन उघडयावर शौचास  जातात. त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही करण्याचा इशारा बिडीओ स्मिता पाटील यांनी दिला. त्यांच्या या भूमिकेमुळे लोणार तालुका लवकरच हागणदारीमुक्त होणार  असल्याचे सुखद चित्र दिसत आहे.