Breaking News

डीएसकेंचा ससून रूगणालयात मुक्काम

पुणे : गुंतवणूकदारांच्या फसवणुकीप्रकरणी अटकेत असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस.कुलकर्णींना आज पुन्हा ससून रूग्णालयात हलवण्यात आले आहे. डीएसकेंना अडमिट करण्याची आवश्यकता असल्याची माहिती ससून रूग्णालयाच्या डॉक्टर्सच्या टीमने दिली आहे. दहा डॉक्टरांच्या पथकाकडून डीएसकेंची चाचणी करण्यात आली आहे.

गुंतवणूकदारांचे 230 कोटी रुपये थकवल्याप्रकरणी डीएसकेंवर गुन्हा दाखल आहे. तीन दिवसांपूर्वी याप्रकरणी कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली होती. मात्र, कोठडीत येताच ते पाय घसरुन पडल्याचे सांगण्यात आले. तसंच त्यांच्या डोक्मयाला इजा झाल्याचेही पोलिसांनी म्हटलं आहे. यानंतर डीएसकेंना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.