Breaking News

राज्यात येत्या 24 तासात पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात येत्या 24 तासांत बहुतांश भागात पाऊस होणार आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कुलाबा वेधशाळेने ही माहिती दिली आहे. विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पावसाच्या इशार्‍याच्या आठवड्यातही राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. कल्याण, डोंबिवली, पुणे परिसरात पावसाने हजेरी लावली होती.