पारनेर तहसिल मध्ये तलाठी व मंडलधिकारी यांचा कौतुक सोहळा.
राष्ट्रीय भूमिअभिलेखाचे संगणिकरण कार्यक्रमामध्ये पारनेर तालुक्यातील 131 गावापैकी 106 गावांचे संगणकीकरण करण्याचे काम पूर्ण झाले असुन, राज्यातील कामाची टक्केवारी 70% टक्के आहे. 7/12 चे संगणकीकरण कार्यक्रम 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासुन चालु आहे. सन 2015 मध्ये आफलाईन कामांची सिडी जिल्ह्यात सर्वात उशिरा आणि सदोष सादर केलेली होती. त्याचा परिणाम म्हणुन तालुका सर्वात मागे होता. परंतु नजिकच्या कालावधीत हे काम एक आवाहन म्हणुन कार्यालयाने हाती घेतले होते. अतिशय सदोष असलेला डाटा ऑनलाईन संगणकीकरणामध्ये दुरुस्ती करणे अतिशय जिकरीचे होते. तरी देखील राञंदिवस काम करुन सर्वात शेवटी असलेला पारनेर तालुका जिल्ह्यात सर्वात प्रथम क्रमांकावर असुन 81% टक्के काम पूर्ण केलेले आहे. या कामात तलाठी व मंडलाधिकीरी यांनी मोलाचे योगदान दिले. त्याबद्द्ल त्याचा गुणगौरव क कौतुक करण्यात आले.