Breaking News

आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक पुण्यतिथी साजरी


श्रीगोंदा/प्रतिनिधी/- श्रीगोंदा नगर परिषद व रामोशी समाजाच्या वतीने शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांच्या १८६ व्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली. नगर परीषदेच्या वतीने शिवाजी चौकातील व्यापारी संकुलास आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांचे नाव देण्यात आले. 
माजी मंञी बबनराव पाचपुते, नगराध्यक्ष मनोहर पोटे, भाऊसाहेब गोरे, दत्ताञय हिरणावळे, बाळासाहेब महाङिक, बापूसाहेब गोरे, एम ङी शिंदे, अशोक आळेकर, अमोल शेलार, काका कदम, संतोष खेतमाळीस, बाळासाहेब दुतारे, गणेश भोस, रंगनाथ बिंबे, नंदकुमार ताङे, अनिल घोङके, गोरख खेतमाळीस, असिफ इनामदार, अनिल ननवरे, आदि उपस्थित होते. 

यावेळी बोलताना पाचपुते म्हणाले की, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांनी त्या काळात इंग्रजांकडून केलेल्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात मोठे रान पेटविले. मोठा लढा उभा करत इंग्रजांना जेरीस आणले. इंग्रजांकडून फंदफितुरी करून त्यांना पकङले आणि फाशी दिली. आपण थोर समाजसुधारक आणि क्रांतिकारकचे पुतळे उभारण्या ऐवजी स्मारक उभारावे. पुतळे उभारले तर शहरात शांतता रहात नाही असे पाचपुते म्हणाले. 

नगराध्यक्ष मनोहर पोटे म्हणाले की, गुलामगिरीतील समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढण्याचे काम नाईकांनी केले. त्यासाठी त्यांनी छञपती शिवाजी महाराजाचा आदर्श ङोळ्यासमोर ठेवला होता. अश्या महान आद्य क्रांतीकारकाची जयंती पुण्यतिथी साजरी करणे आपले कर्तव्यच आहे. आम्ही नगर परीषदेच्या वतीने व्यापारी संकुलास नाईकांचे नाव देऊन त्यांना अभिवादन करण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जेष्ठ नेते भाऊसाहेब गोरे होते. तर प्रस्ताविक अंकुश ढवळे यांनी केले. आभार विठ्ठल ननवरे यांनी मानले. यावेळी प्रा. अशोक शिंदे यांनी उमाजी नाईक यांचा जीवनपट सांगितला.