चौकशी करून कारवाई करणार - मुख्याधिकारी कोळेकर
याबाबत अधिकची मिळालेली माहिती अशी की ,श्रीगोंदा नगरपालिका हद्दीत सध्या घोड धरणावरून नवीन पाणी योजना चालू आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात चालू आहे. या योजनेसाठी केंद्राकडून कोट्यवधी रुपये माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या अथक परिश्रमातून मिळाले आहेत. त्यामुळे पालिका या योजनेतून वाड्या वस्त्यावर पाणी पुरवठा करणार आहे. पण हे काम करताना काही वाड्यावर पाईप लाईन पुरण्यासाठी जे चर खोदले आहेत. त्याच चरामध्ये काही काही खाजगी व्यक्तींनी स्वतःच्या फायद्यासाठी खाजगी पाईपलाईन पालिकेच्या खर्चाने उकरलेल्या चरामध्ये टाकले आहेत. याबाबत दैनिक लोकमंथनने वृत्त प्रसिद्ध करताच पालिका वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकाराबाबत मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांचेशी संपर्क साधला असता, ते म्हणाले या खाजगी पाईपलाईनचा शोध घेऊ. हे काम करणाऱ्या ठेकेदाराला जाब विचारला जाईल. व त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल असे कोळेकर म्हणाले