Breaking News

नाथषष्ठी’चा पोलिसांनी घेतला आढावा


पैठण प्रतिनिधी  :- श्रीक्षेत्र पैठण येथे मार्च महिन्यात होणार्‍या संत एकनाथ महाराज षष्ठी यात्रा महोत्सवाची तयारी जोरात सुरु आहे. यासाठी लागणार्‍या पोलीस बंदोबस्ताचा उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, पोलीस निरीक्षक चंदन इमले यांच्यावतीने नुकताच आढावा घेण्यात आला. 
यावेळी बाहेरील नाथ समाधी मंदीर, गावातील नाथमंदिर वाडा, संपूर्ण यात्रा मैदानाची पाहणी करण्यात आली. दि. ८ मार्चपासून सुरू होणार्‍या संत एकनाथ षष्ठी महोत्सवाला राज्यभरातून येणार्‍या लाखो भाविकांच्या सुरक्षितेसाठी पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेण्यात आला. यावेळी पोलिसांच्यावतीने दोन्ही नाथ मंदीर तसेच यात्रा मैदान भागात पोलीस बंदोबस्त, पोलीस मदत कक्ष सीसीटीव्ही कक्ष, सीसीटीव्ही मनोरे, पोलीस चेक पॉईंट, महिला मदत कक्ष तसेच शहरात येणार्‍या सर्व प्रमुख रस्त्यावर चेक पॉईंट आदी ठिकाणच्या जागेची पाहणी करण्यात आली. यंदाच्या नाथषष्ठीला राज्यभरातून सुमारे १० लाख भाविक येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.