Breaking News

दुर्लक्षित भागात आरोग्य शिबीरांची आवश्यकता


नगर - विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सुदृढ राहिले पाहिजे. त्यासाठी लहापणापासूनच त्यांच्या आरोग्याकडे पालकांनी आणि शिक्षकांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. कारण आजचा विद्यार्थी हा उद्याच्या देशाचा नागरिक आहे. यासाठी शासकीय तसेच सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली पाहिजे. विशेषत: दुर्लक्षित भागातील मुले यांच्याकडे तर विशेष लक्ष देऊन त्यांची नियमित तपासणी करुन त्यावर उपया योजना केली पाहिजे. मखदूम सोसायटी व मराठा महासंघाच्यावतीने विद्यार्थी व पालकांसाठी राबविण्यात आलेला आरोग्य तपासणीच उपक्रम कौतुकास्पद असाच आहे, असे उपक्रम इतरांनीही राबवावेत, असे प्रतिपादन युनायटेड सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.इम्रान यांनी केले.