Breaking News

शिक्षकांनी विद्रोही बनावे ः प्रा. सावंत

जग बदलण्याची क्षमता शिक्षकांमध्ये आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीतून धर्मसत्ता व राजसत्तांची गुलाम पिढी निर्माण होत आहे. आत्मविवेकी व स्वतंत्र विचाराची साहसी पिढी निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी विद्रोही बनावे, असे प्रतिपादन ग्रामीण साहित्यिक प्रा. भाऊसाहेब सावंत यांनी केले.


खानापूर ता. शेवगाव येथील जिजामाता माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुरेश गुंड हे होते. प्रा. सावंत पुढे म्हणाले की, ज्ञान हेच खरे धन आहे, बहुजन समाजातील तरुणांनी परिस्थितीशी सामना करत शिक्षण घ्यावे. ध्येय निश्‍चित करून ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे. विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन बाळगावा. पुस्तकाशी मैत्री करावी. वाचनातून महामानव घडतात. त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घ्यावी. या कार्यक्रमासाठी मुंगाजी बल्हाळ, गोकुळ घुमरे, महेश थोरात, तुळशीराम खताळ, सीताराम भुसारी, बाळासाहेब फसले, अनंत पाखरे सह सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुंभागी कुलट आणि अनिता थोरात यांनी केले.