Breaking News

शेतकरी राजाला वाचविण्यासाठी एकसंघ व्हा: विट्ठलराव लंघे पाटील


भेन्डा/प्रतिनिधी/- शेतकरी राजाला वाचविण्यासाठी एकसंघ व्हा असे वक्तव्य विट्ठलराव लंघे पाटीलने केले. भाजप- शिवसेना सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र भर चालु आसलेल्य हल्ला-बोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते
माजी उपमुख्यमंत्री आजित पवार, मा धनंजय मुंडे , सुनिलराव तटकरे यांच्या नेतुत्वाखाली चालु असलेल्या राज्यभर हल्लाबोल आंदोलन लवकरच अहमदनगर जिल्हात येत आहे. त्या निमित्ताने रविवार दिंनाक 4-2-2018 रोजी सकाळी 9:30 वाजता लक्ष्मी मंगल कार्यालय नेवासा फाटा (पावन गणपति मंदिरा शेजारी) नेवासा तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीसाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष मा.आ. चंद्रशेखर घुले पाटील, राष्ट्रवादी चे नेते दादाभाऊ कळमकर, विठ्ठलराव लंघे पा, मा. आ. पाडुरंग आभंग , देसाईआबा देशमुख, तालुका अध्यक्ष काशिनाथ नवले, तालुका युवक अध्यक्ष नवनाथ सांळुके पा, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन लंघे पाटील व दादाभाऊ गंडाळ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नेवासा तालुका यांनी केले.