चोराने मारला ३ लाखाच्या बॅटऱ्यांवर डल्ला.
याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की , फीर्यादी आदम महेबुब पठाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कोरडगाव रोडवरती माझे बॅटरीचे दुकान असुन ३१ जानेवारी रोजी रात्री ९ नंतर दुकान बंद केले. १ फेब्रुवारी रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी आलो असता, दुकानाला लावलेले कुलूप दिसून आले नाही. त्यानंतर शेजारील दुकानात पाहिले असता, त्यातील बॅटरी, इन्व्हर्टर, दुरुस्ती साठी आणलेल्या बॅटऱ्या, मोटार गाड्याचे आर्मीचर, स्टार्टर ,व इतर गाड्याची पाहणी केली असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
नेमके काय झाले हे पाहण्यासाठी शेजारील श्रीराम बालरुग्णालयाचे सी.सी.टी.व्ही.फुटेज कॅमेऱ्यात पाहिले असता, दुकानासमोर रात्री १ वाजता क्रूझर गाडी व टाटा जीप उभी असल्याचे दिसून आले. तरी या चोरीमध्ये १लाख २० हजार रुपयांचा दुरुस्तीसाठी आलेल्या बॅटऱ्या तसेच नवीन बॅटऱ्या गाडीचे स्पेअर पार्ट असा एकूण ३,१०,६००/- मुद्देमाल चोरीला गेला असल्याचे फ़िर्यदिने म्हटले आहे. तरी याबाबत पाथर्डी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्याभरात ही पाथर्डी शहरात दुसरी चोरी असून एका चोरीत एका महिलेला जीव गमवावा लागला असून, दोन दिवस उलटत नाही. तोच दुसरी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तर चोरीमुळे नागरिकांच्या मनाला कुठे तरी असुरक्षित असल्याचे जाणवत आहे. काही नागरिकांनी होत असलेल्या चोरीचा धसका घेतला असुन, पाथर्डी पोलिसांनी वेळीच या शहरातील चोरी सत्र गंभीरपणे घेऊन चोरट्याच्या मुसक्या आवळने गरजेचे आहे.