Breaking News

सिंधुदुर्ग किल्ल्यात शिवजयंती साजरी

सिंधुदुर्गनगरी, दि. 20, फेब्रुवारी - मालवण तालुक्यात वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार वैभव नाईक यांनी शिवाजी महाराजांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून वंदन केले. 

सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांची 388 वी जयंती साजरी होत असताना शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्‍वर मंदिरातही वायरी ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार वैभव नाईक यांनी मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून वंदन केले. या वेळी ’जय भवानी जय शिवाजी’ च्या गजराने आसमंत दुमदुमून गेला.