Breaking News

आ. नरेंद्र घुले यांचे हस्ते तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन


नाफेड मार्फत शासकीय तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ ज्ञानेश्‍वर उद्योग समूहाचे प्रमुख मा. आमदार नरेंद्र घुले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तसीलदार दिपक पाटील उपस्थित होते. यावेळी घुले पाटील म्हणाले की, मागील वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीने 40 कोटी रुपयांची तूर खरेदी केली होती, शेतकर्‍यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला, तसेच चालू वर्षी सर्व शेतकर्‍यांची तूर खरेदी करण्यात येईल शेतकर्‍यांनी ऑनलाइन फॉर्म भरून नाव नोंदणी करावी, फॉर्म भरते वेळेस शेतकर्‍यांनी सातबारा उतारा, त्यावर आधारकार्ड बँक पासबुक झेरॉक्स सोबत घेऊन, आखेगाव रोडवरील जगदंबा महिला बचत गटाच्या केंद्रावर जाऊन फॉर्म भरून नोंदणी करावी. त्यानंतर आपल्याला फोन करण्यात येतील, त्यादिवशी शेतकर्‍यांनी आपली तूर खरेदी केंद्रावर घेऊन यायची आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीने चालू वर्षी नवीन ग्रेडर बसवल्यामुळे मालाची प्रतवारी अचूकपणे कळते, त्यामुळे शेतकर्‍यांनी निश्‍चिंत रहावे. चार ते पाच दिवसांमध्ये आपल्या खात्यावर पैसे वर्ग होणार, तसेच चालू वर्षी (5450 )रुपये हमीभाव असल्या कारणाने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावर्षी पाथर्डी शेवगाव नेवासा तीनही तालुके एकत्र केल्यामुळे सर्वानी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच चालू वर्षी कृषी उत्पन्न बाजार समिती लवकरच हरभरा खरेदी केंद्र सुरू करणार असल्यामुळे शेतकर्‍यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन ज्ञानेश्‍वर चे संचालक काकासाहेब नरवडे, माणिक थोरात, अ‍ॅड. विजय जोशी, अरुण लांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती संजू फडके, रामनाथ राजपुर, कृष्णा ढोरकुले, हमाल युनीयनचे, एजाज काझी, जगदंबा महिला बचत गटाच्या अध्यक्ष विघ्ने, सर्व संचालिका, माधव काटे, रतन मगर गुरूजी, ताहेर पटेल, काँग्रेस तालुकाध्यक्ष कैलास नेमाने, संचालक सुधाकर तहकीक, नंदू मुंडे, ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब जोशी, पं. स. सदस्य कृष्णा पायघण, एकनाथ कसाळ, दत्ता फुंदे, बाळासाहेब फटागडे, दादा पाचरणे, अजय नजन, ग्रेडर विघ्ने, हमाल-मापाडी सर्व शेतकरी बंधू उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका युवक अध्यक्ष ताहेर पटेल यांनी तर आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय कोळगे यांनी मानले.