Breaking News

धानोरा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ


जळगाव, - चोपडा तालुक्यातील धानोरा येथील जवळच असलेल्या पंचक येथे जिल्हा परिषदेच्या उर्दू व मराठी शाळेत चोरी झाल्याची घटना घडली. गेल्या दोन दिवसांपुर्वीच पंचक आणि धानोरा गावात चोरट्यांनी हैदोस घातला असतानाच पुन्हा एकदा पंचक गावाला चोरट्यांनी लक्ष केले आहे. 
पंचक येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन उर्दू आणि मराठी शाळा आहे. चोरट्यांनी येथील शाळेत दरवाज्यांचे कुलूप, कळी, कोडा काढुन घेत आत प्रवेश करित शाळेत असलेल्या संपूर्ण शैक्षणिक साहित्याची तोडफोड, नासधुस करत, शाळेतील शालेय शालेय पोषण आहाराचे साहित्य चोरुन नेले, त्यात मुगदाळ 25 किलो, मटकी 25 किलो, तेल 4 बॅगा, ’शाळेचे रबरी शिक्के, वटाणे 20 किलो, मसुरदाळ 45 किलो यांसह, मराठी शाळेतील 10 किलो वजनाचे अ‍ॅल्युमिनियमचे पातले अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. दरम्यान, पोलिसांकडून पंचनामे करण्याचे काम सुरू होते.