Breaking News

जळगावातील ग्रामीण रस्त्यांच्या विकासाला प्राधान्य - गुलाबराव पाटील


जळगाव - जळगाव जिल्ह्यातील शेतक-यांच्या व ग्रामस्थांच्या हितासाठी रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे. मतदारसंघात रस्ते विकासाला प्राधान्य दिले असून या परिसरातील पाळधी-झुरखेडा -दहिदुलले रस्त्यावरील झुरखेडा गावजवळील पूल व अंजनविहिरे - खामखेडा दरम्यानचा पुलांचा प्रश्‍न लवकरच मार्गी लावून त्यासाठी सुमारे 4 कोटी 25 लक्ष निधी उपलब्ध करणार, प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच दामू अण्णा पाटील हे होते. हिंगोणे, कल्याणे, पिंप्री, विहीर फाटा, सोनवद, बांभूळगाव रस्ता प्रजिमा 52 या 2 कोटी 50 लाखाच्या रस्त्याचे भूमीपूजन विहीर फाटा, कल्याणे व हिंगोणे येथे सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या मार्गाच्या 14 किमी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच या रस्त्यावर 2 मो-यांचे काम ही हाती घेण्यात आले आहे.