Breaking News

धुळे शहरात 186 अतिक्रमणं जमीनदोस्त

धुळे  - धुळे शहरातील साक्रीरोडचे रूंदीकरण करण्यात येत असून, रस्ता मोजमापाच्या 28 मीटर दरम्यान येत असलेल्या जवळपास 186 अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण आज सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जमीनदोस्त करण्यात आले. चार जेसीबींच्या सहाय्याने काढण्यात आलेल्या या अतिक्रमणात काही दुकानदारांसह रहिवाशांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढले. 


तर पथकाने येथील मोतीनाला ते सुरेंद्र डेअरी दरम्यान करण्यात येत असलेल्या या अतिक्रमणावर जेसीबी चालविला. या मोहिमेत रहदारीस अडथळा येवू नये याकरीता पोलिसांच्या बंदोबस्तासह शहर वाहतुक शाखेचे पथकही याठिकाणी तैनात करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने यापुर्वीच संबंधीत अतिक्रमण धारकांना नोटीस बजावली होती. त्या अनुषंगाने आज सकाळी स्थानिक रहिवाशांनी तसेच लहान व्यापा-यांनी आपापले अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली होती. या 186 अतिक्रमणांमध्ये काही दुकाने तर काही रहिवासी घरांचा समावेश आहे.