शिर्डीच्या साईंचा खजिना झाला २ हजार कोटीचा!
दरम्यान, येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली. हे वर्ष साईबाबा संस्थान साईशताब्दी वर्ष म्हणून साजरी करीत आहे. येणाऱ्या भक्तात देणगी व जडजवाहीर व सोने देण्याची चढाओढ कायमच दिसून येते. विविध उत्सवाप्रसंगी परराज्यातील अनेक साईभक्त तर कधी सोन्याच्या रुपात तर कधी गुप्तदान करून बाबांच्या दानपेटीत दान देऊन पुण्य मिळवत असतात. भक्तहितासाठी संस्थान आरोग्य निवास भोजन सुविधा देत असते. साईबाबा हॉस्पिटलमध्ये वर्षभरात महाराष्ट्रासह परराज्यातील रुग्ण शिर्डीत येत असतात. त्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. साईबाबा संस्थान येणाऱ्या भक्तांसाठी मोफत भोजन देत असते. त्या भोजनाचा ही लाभ काही कोटी भाविक घेत असतात. वर्षभरात अडीच ते तीन कोटी
भावी साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाकडून शताब्दी वर्षात मोठ्या प्रमाणावर कामे झाली, शिर्डीच्या विकासाला हातभार लागू शकतो. त्यातून शिर्डीच्या अर्थकरणातून अनेकांना रोजगार प्राप्त झाला आहे. या परिसरात जवळपासच्या ३ तालुक्यातील तरुणांना रोजगार निर्माण झाला आहे. दरम्यान, शिर्डी शहराचा पायाभूत विकास होण्यासाठी संस्थानने पुढाकार घेतला पाहिजे. शहराची लोकसंख्या अवघे ३५ हजार असली तरी दिवसभरात ४० ते ५० हजार तर सण उत्सव व गर्दीच्या काळात लाखभर भाविक शिर्डीला भेट देत असतात. त्यामुळे साईभक्तांसाठी वाहनतळ, चांगले रस्ते, मनोरंजनाची साधने उपलब्ध केली तर संस्थांच्या उत्पन्न आणि भाविकांता आणखी वाढ होऊ शकते. त्यासाठी साईबाबा संस्थानने विविध धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.
