Breaking News

भाषादिनानिमित्त निबंध व कविता लेखन स्पर्धा


कोपरगांव ता. प्रतिनिधी :- आजच्या {दि.३} कवि कुसुमाग्रज यांचा जन्मदिन अर्थात मराठी भाषादिनी मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याकरीता निबंध व कविता लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती येथील सांची बहुउद्येशिय वेलफेअर फाउंडेशननचे रविंद्र साबळे यांनी दिली. मराठी भाषा जतन व संवर्धन करणेसाठी नव्या पिढीला मराठी भाषेतील व ग्रामीण भागातील शब्दसंचय, म्हणी, वाक्प्रचार आदींची माहिती होण्यासाठी येथील चंद्रमा कलर फोटो, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोपरगांव तालुका आणि सांची बहुउद्येशिय वेलफेअर फौडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय निबंध व काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.