Breaking News

आज डॉ. गोपाळराव मिरीकरांनी स्वरबद्ध केलेल्या गीतांचा कार्यक्रम

अहमदनगर / प्रतिनिधी । ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ आणि संगीतकार डॉ. गोपाळराव मिरीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतांचा माझे जगणे होते गाणे, या कार्यक्रमाचे आयोजन रविवार आज बीपीएचइ सोसायटीच्या अकॅडमी ऑफ फाईन अ‍ॅण्ड परफॉर्मिंग आर्टस् च्या वतीने करण्यात आल्याची माहिती देवाशिष शेडगे आणि प्रा. डी ए कुलकर्णी यांनी दिली.


हा कार्यक्रम अहमदनगर महाविद्यालयासमोरील आय.एम.एस संस्थेच्या सीडीसी सभागृहात सायंकाळी 5 वाजता होणार आहे. डॉ. मिरीकर यांच्या संगीत क्षेत्रातील शिष्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे, रसिकांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन अद्वैता शेडगे आणि उमा इनामदार यांनी केले आहे. या कार्यक्रमात कवी कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, माधुरी हुद्देदार, विवेक दसरे आणि समीर थिटे यांच्या डॉ. मिरीकरांनी संगीतबद्ध केलेल्या रचना सादर होणार आहेत.