Breaking News

काँग्रेस कमिटीच्या वतीने जयंतराव ससाणे यांना श्रद्धांजली


नेवासा/शहर प्रतिनिधी/- काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष स्वर्गीय जयंतराव ससाणे यांना नेवासा येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सर्व पक्षांच्या नेत्यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा.

नेवासा येथील पंचायत समिती प्रांगणात काँग्रेस कमेटीच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष संजय सुखधान, तालुकाध्यक्ष बाळासाहेब भदगले, निवृत्ती पाटील काळे, अँड अण्णासाहेब अंबाडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष संजय सुखधान, भाजपचे जिल्हा चिटणीस नितीन दिनकर, नगरसेवक दिनेश व्यवहारे, सुधीर चव्हाण, आण्णासाहेब पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भदगले, निवृत्ती काळे, काँग्रेसचे सचिव संदीपबाबा क्षिरसागर, अॅड.आण्णासाहेब अंबाडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजली अर्पण करतांना व ससाणे यांच्या समवेत घातलेल्या अविस्मरणीय क्षण सांगतांना जयंतराव ससाणे यांनी बहुजनांच्या हितासाठी सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम केले. त्यांच्या अकस्मात निधनाने बहुजन समाजाचा आधारवड हरपला आशा भावना व्यक्त करण्यात आल्या.