सोनई/ प्रतिनिधी /- मुळा उजव्या लाभक्षेत्रातील पाण्याची पातळी घटत चालली असून, सध्या ऊस गहू, हरबरा, आदी पिके असून शेवटच्या दोन पाण्याचा आवर्तनाची आवश्यकता आहे. गावातील अनेक विहिरी, बोअरमधील पाणी हे पन्नास टक्के पेक्षा कमी झालेले आहे. आणि अश्या एकूण परिस्थितीत पाणी टंचाईची परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी आवर्तन अत्यंत गरजेचे आहे. धरणात पाणीसाठा वीस टी, एम. सी. इतका असून तातडीने पिके वाचवण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर येळवंडे यांच्यासह अनेक शेतकऱयांनी केली आहे.
मुळा उजव्या कालवा आवर्तनाची आवशकता: येळवंडे
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:38
Rating: 5