Breaking News

वित्तीय तुटीच्या आकड्यांमध्ये काळेबेरे : मनमोहन सिंह


केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारकडून सादर करण्यात आलेल्या वित्तीय तुटीच्या आकडेवारीत नक्कीच काहीतरी काळेबेरे असल्याची शंका, माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली. आगामी निवडणुकांमध्ये फायदा मिळवण्याच्यादृष्टीने अर्थसंकल्प सादर करण्यात आला, असा आरोप मी करत नाही. मात्र, अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलेल्या वित्तीय तुटीच्या आकडेवारीत नक्कीच काहीतरी घोळ आहे, असे मनमोहन सिंह यांनी म्हटले. जेटली यांनी स्वामीनाथ आयोगाच्या शिफारसीनुसार शेतकर्‍यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट रक्कम हमीभाव देण्याची घोषणा केली. येत्या खरीप हंगामापासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, हे कशाप्रकारे साध्य होणार? यामुळे शेतकर्‍यांचे उत्त्पन्न दुप्पट कसे होणार, असे सवाल मनमोहन सिंह यांनी उपस्थित केले.