मुंबईला जगाचे शॉपिंग डेस्टिनेशन बनवणार - जयकुमार रावल
रावल म्हणाले, मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल हा कार्यक्रम जागतिक मंचावर नेऊन खरेदीच्या चाहत्यांसाठी तसेच सांस्कृतिक महोत्सव म्हणून हे एक चांगले व्यासपीठ निर्माण करणे असा आमचा उद्देश आहे. पुढील वर्षी या कार्यक्रमाचे अजूनही भव्य पद्धतीने आयोजन केले जाईल. हा कार्यक्रम म्हणजे एमटीडीसीच्या सर्वांत मोठ्या उपक्रमांपैकी एक असून येत्या काही वर्षांत यापेक्षा आणखी मोठ्या प्रमाणावर आम्ही तो साजरा करू, असे ते म्हणाले. सांगता समारंभामध्ये तालवाद्य वादक तौफिक कुरेशी आणि त्यांचा बँड मुंबई स्टॅम्प यांनी कला सादर केली. कविता सेठ यांचा सुफी संगीताचा कार्यक्रम झाला. पुणेरी पध्दतीने परंपरागत तालवाद्ये वाजवणार्या मोरया पथकाने कला सादर केली.
