1 लाख 24 हजार 874 ग्राहकांनी ऑनलाईन वीज बिल भरले
सोलापूर, दि. 03, फेब्रुवारी - महावितरणाने संकेतस्थळासोबतच मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर वीज बिले ऑनलाईन’ भरण्यास ग्राहकांचा कल वाढत असल्याची स्थिती आहे. 2017 मध्ये सोलापुरातील 1 लाख 24 हजार 874 ग्राहकांनी 154 कोटी 14 लाख रुपये ऑनलाईन वीज भरले. तर 2016 मध्ये 88 हजार 499 ग्राहकांनी 67 कोटी 34 लाख ऑनलाइन वीज बिल भरले होते. एक वर्षभरात 36,375 ग्राहकांकडून 87 कोटी 20 लाख रुपयांची वाढ झाली आहे.
2017 मध्ये बारामती परिमंडलात 4 लाख 73 हजार 290 वीजग्राहकांनी 393 कोटी 95 लाख रुपयांच्या वीजबिलांचे ऑनलाइन पेमेंट केले आहे. यात बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील 82 हजार 100 ग्राहकांनी 104 कोटी 23 लाख, सोलापूर मंडलातील 1 लाख 24 हजार 874 ग्राहकांनी 154 क ोटी 14 लाख तर सातारा मंडलातील 2 लाख 66 हजार 316 ग्राहकांनी 135 कोटी 58 लाख रुपयांची वीजबिले ऑनलाईन भरली आहेत. 2016 मध्ये बारामती परिमंडलात 3 लाख 43 हजार 191 वीज ग्राहकांनी 200 कोटी 15 लाख रुपयांच्या वीज बिलांचे ऑनलाईन पेमेंट केले होते. यात बारामती मंडलांअंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील 58 हजार 554 ग्राहकांनी 52 कोटी 72 लाख, सोलापूर मंडलातील 88 हजार 499 ग्राहकांनी 67 कोटी 34 लाख तर सातारा मंडलातील 1 लाख 96 हजार 138 ग्राहकांनी 80 कोटी 9 लाख रुपयांची वीजबिले ऑनलाइन भरली होती. 2016 च्या तुलनेत वीज बिले ऑनलाइन ग्राहकांची संख्या 2017 मध्ये वाढल्याची दिसून येते.