Breaking News

उत्तर भारतासाठी उन्हाळ्यात अधिक रेल्वेगाड्या सोडण्याची मागणी

मुंबई, दि. 03, फेब्रुवारी - मुंबई शहर तसेच परिसरातील लाखो उत्तर भारतीयांच्या सोईसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईतून उत्तर भारतात जाणार्‍या रेल्वेगाड्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या उत्तर भारतीय सेलने पश्‍चिम रेल्वेच्या महाप्रबंधकांकडे शुक्रवारी केली.


निवेदनात म्हटले आहे की, मुंबई ते वाराणसी सुरत मार्गे गाडी चालविण्यात यावी, बांद्रा - गाझिपूर गाडी सध्या आठवड्यातून एकदा धावते ती तीन वेळा सोडावी, प्रतीक्षा यादीतील प्रवाशांसाठी समांतर गाड्या चालवाव्यात, उत्तर भारतात जाणार्‍या गाड्यांना जादा डबे जोडावेत तसेच लखनौ - गोरखपूर - दरभंगा यांच्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात.