Breaking News

पुण्यात ‘महाटेक 2018’ प्रदर्शन 8 फेब्रुवारीपासून

सांगली, दि. 04, फेब्रुवारी - उद्योग क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करून देणारे ‘महाटेक 2018’ हे प्रदर्शन 8 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत पुणे येथील सिंचननगर (शिवाजीनगर) येथील कृषी महाविद्यालयाच्या नवीन पटांगणावर आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन ‘कोनक्रेन’चे व्यवस्थापकीय संचालक सुहास बक्षी, पालक मंत्री गिरीश बापट व पुणे महापालिकेच्या महापौर श्रीमती मुक्ता टिळक यांच्याहस्ते होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र इंडस्ट्रिज डिरेक्टरीचे संचालक विनय मराठे यांनी दिली.


या प्रदर्शनासाठी उद्योग मंत्रालय, महाराष्ट्र राज्य आणि इंडो- आङ्ग्रिकन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, स्कूल ऑफ इन्स्पिरेशनल लिडरशीप, शारदा केबल ट्रेज प्रा. लि. व फायर फ्लाय फायर पम्प यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. हे प्रदर्शन दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी मोङ्गत खुले असणार आहे. या प्रदर्शनात उद्योग क्षेत्रातील नवीन उत्पादने, यंत्रसामुग्री, उपकरणे व विकास यांचा समावेश असणार आहे. 
यंदाचे हे 14 वे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनात सुमारे 300 हून अधिक कंपन्या सहभागी होत असून 40 हजाराहून अधिक उद्योजक या प्रदर्शनास भेट देणार आहेत. सांगली जिल्ह्यातील काही नामांकित कंपन्यांचाही या प्रदर्शनात सहभाग असणार आहे. उत्पादन क्षेत्राची वाढ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ला पाठिंबा हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. संपूर्ण देशभरातील उद्योजकांना आपली बुध्दिमत्ता, आधुनिक विचारसरणी व आपल्या व्यवसायातील क्षमता वाढवून आधुनिकीकरणाची कास धरण्यासाठी हे एक मोठे व्यासपीठ आहे.
या प्रदर्शनामुळे उद्योजकांसाठी नवनवीन संधी उपलब्ध होतात. याशिवाय उद्योजक आपली उत्पादने, उपकरणे विपणनासाठी व विक्रीसाठी उपलब्ध ठेवतात. त्यामुळे देशभरासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योजकांचे अद्ययावत तंत्रज्ञान व उपकरणे पाहता व खरेदी करता येणार आहेत. या प्रदर्शनात छोट्या उद्योजकांसाठी . 9 फेब्रुवारी रोजी ‘व्हेंडर डेव्हलपमेंट मीट’, 10 फेब्रुवारी रोजी ‘जीएसटी की बात’, त्याच दिवशी दुपारी ‘एसएमईएस’साठी डिजीटल मार्केटिंग, तर 11 फेब्रुवारी रोजी ‘एन्त्रेप्रेनेऊरशिप डेव्हलपमेंट’ अशा चार विषयावर चर्चासत्रही आयोजित करण्यात आल्याचे विनय मराठे यांनी सांगितले.