Breaking News

एकनाथ खडसे यांनी पुन्हा मंत्रिमंडळात यावे : पंकजा मुंडे


मुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे मंत्रिमंडळात परतावेत अशी सगळ्यांचीच इच्छा असल्याचा दावा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एक नाथ खडसे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, पंकजा मुंडे यांनी ही चर्चा निरर्थक असल्याचं म्हटलंय. 

पंकजा मुंडे या एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी, एकनाथ खडसेंची दिल्ली वारी ही निव्वळ चर्चा आहे, त्यात फार काही नाही असं म्हणत पंकजा यांनी खडसेंची पाठराखण केली. एकनाथ खडसेंनी मं त्रिमंडळात यावं अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली. मासिक पाळीच्या निमित्तानं घेतल्या जाणार्‍या सुट्टीला त्यांनी विरोध केला. मासिक पाळीच्या दरम्यान पाळल्या जाणार्‍या विटाळाला मोडून काढा असं क्रांतीकारी मतही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. दुसरीकडे अस्मिता नावाचं सॅनेटरी पॅड हे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तोडीस तोड असल्याचा दावाही  त्यांनी केलाय.