देशातील पत्रकार असुरक्षित ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालातून समोर
नवी दिल्ली : पत्रकारितेचे ब्रीद घेतलेल्या जगभरातील पत्रकारांना नेहमीच आपल्या सुरक्षेची काळजी सतावत आहे. विशेषत: ही काळजी अशिया खंडातील पत्रकारांना जास्तच सतावते. आशियामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये दहशतवादाचा बळी ठरलेल्या नागरिकांची संख्या अधिक असली, तरी पत्रकारांसाठी मात्र भारतच अधिक धोकादायक असल्याचे एका संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. आशिया खंडातील काही देशांमध्ये पत्रकार, विरोधी पक्षनेते, व न्यायव्यवस्थेशी संबधित व्यक्तींना धमक्या दिल्या जात असून, त्यांच्या हत्याही केल्या जात असल्याचे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे. प्रशांत महासागर क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि पत्रकारांवर हल्ले होण्याचे सर्वाधिक प्रमाण फिलीपाईन्स, भारत आणि मालदीव या देशांमध्ये आहे.
फिलीपाईन्स, भारत आणि मालदीव या देशात गैरकृत्य, समाजातील चुकीच्या बाबी समाजासमोर मांडणार्या पत्रकारांना धमकावले जाते, वेळप्रसंगी त्यांची हत्या देखील करण्यात येते, असे या अहवालात म्हटले आहे. या देशांमध्ये गेल्या 6 वर्षात भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर कारणार्या 15 पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे. पत्रकारांच्या सुरक्षा समितीने ही माहिती दिली आहे. या यादीत न्यूझीलंड आणि डेन्मार्क या देशांचा क्रमांक पहिला लागतो. न्यूझीलंडला 89 तर डेन्मार्कला 88 गुण देण्यात आले आहेत. उलट सीरिया 14, दक्षिण सुदान 12 तर सोमालिया 9 असे गुण आहेत. या तीन देशांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार होतो, असे या अहवालात म्हटले आहे. या क्रमवारीत चीन 77 व्या स्थानी असून त्याला 41 गुण देण्यात आले आहेत. ब्राझील 37 गुणांसह 96 व्या स्थानावर आहे. तर रशिया 29 गुणांसह 135 व्या स्थानावर आहे.