सिद्धिविनायक ट्रस्टकडून जिल्ह्यासाठी 1 कोटी रुपये सुपुर्द
सिंधुदुर्ग, दि. 24, फेब्रुवारी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार अभियानासाठी सिद्धि विनायक ट्रस्ट मुंबई कडून एक कोटी रूपयांचा धनादेश ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सुपुर्द केला. ट्रस्टमार्फ़त सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 16 डायलेसिस मशीन्स देण्यात येणार आहेत. तसेच महामार्गालगत जागा उपलब्ध झाल्यास ट्रामा केअर सेंटर उभारल जाणार असल्याची माहीती यावेळी सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी पत्रकारांना दिली.
जलयुक्त शिवारसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला यापूर्वी दोन टप्यात 1 कोटी 19 लाख रूपयांचा निधी देण्यात आला. त्यानंतर तिसर्या टप्प्यात 1 कोटी रूपयांचा धनादेश सुपुर्द क रण्यात आला. यानंतर पत्रकार परिषद घेऊन ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यानी माहिती दिली. जलशिवार अंतर्गत शिल्लक असलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली या जिल्ह्याना प्रत्येकी 1 कोटी रूपयांचा निधी मंजूर करून देण्याची कार्यवाही सुरु असून ट्रस्ट मार्फ़त राज्यातील 34 जिल्हा आणि उप जिल्हा रूग्णालयांसाठी 7 कोटी 50 लाख रुपये किंमतीचे डायलेसिस मशीन्स आणि ठ ज प्लांट्स मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी जिल्हा रुग्णालयात 2, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाड़ी 2, कणकवली उपजिल्हा रुग्णालय 4, मालवण ग्रामिण रुग्णालय 4, देवगड ग्रामिण रूग्णालय 4 अशी डायलेसिस मशीन्स मंजूर करण्यात आली असून लवकरच त्या उपलब्धही होणार असल्याची माहिती बांदेकर यांनी यावेळी दिली.