सामान्यांच्या न्यायासाठी प्रयत्न : आढाव
शिर्डी / प्रतिनिधी ;- अन्याय अत्याचार रोखण्यासाठी संघटना ठोस भूमिका घेणार आहे. ९ वर्षांत १७ जिल्ह्यात व अनेक तालुक्यात संघटना वाढली. सामान्य माणूस समोर ठेऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला. जे सोडून गेले, त्यांना सोडून व जे आज आमच्याबरोबर आहेत, त्यांना घेऊन वाटचाल करु. संघटनेच्या माध्यमातून सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश आढाव यांनी केले.
शिर्डी नगरीत अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारविरोधी संघटनेच्यावतीने राज्य भव्य मेळावा नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. संघटनेचे उपाध्यक्ष विनोद हरनामे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष अनिल गागूंर्डे, संदीप गोरे, विश्वास त्रिभवन, विश्वनाथ वाघ, सिमोन जगताप आदींसह युवक कार्यकर्ते
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष गागूंर्डे, संदीप ठोंबरे, रवि शिंदे, बारकू, दशरथ खालकर, वजीर शेख, रमजान पठाण, नरेंद्र पवार, विजय ताते, रत्ना गवळी, विशाल गाडेकर, संजय वायकर, ज्ञानेश्वर पवार, सोमनाथ पुरे, बबलू भालेराव, निलेश ठोंबरे आदींसह हजारो कार्यकर्ते हजर होते.