नाशिक जिल्हा कृषि महोत्सवास चांगला प्रतिसाद
जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी बचतगट आणि शेतकरी उत्पादक कंपनीतील शेतकर्यांच्या उत्पादित मालाला योग्य दर मिळावा तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नाशिक जिल्हा कृषि महोत्सवांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
संमेलनाच्या माध्यमातुन उत्पादक शेतकरी, निर्यातदार आणि खरेदीदार संस्थेचे प्रतिनिधी यांची एकाच ठिकाणी चर्चा घडवून आणण्यात आली. विविध उद्योगसमुह, निर्यातदार, परदेशी कंपन्या असे 25 खरेदीदार उपस्थित होते. त्यामध्ये बिग बाझार, गोंगळ प्रोसेसिंग कंपनी, युनिक ग्रीकल्चर, फिल्डफ्रेश ग्रीकल्चर, टेक्निकल झोन, स्केलर ट्रेडिंग कंपनी, स्टार ग्री बाझार, केपरी कॉर्न आदींचा यात सहभाग होता. सत्राच्या सुरुवातीस विविध उत्पादनांबाबत असलेल्या अपेक्षा आणि उत्पादनाची गुणवत्ता यावर निर्यातदारांनी सखोल माहिती दिली. यांमध्ये शेतकर्यांनी फसवणुक टाळण्यासाठी निर्यातदारांची आर्थिक बाजू लक्षात घेणे, गतवर्षीच्या आयात निर्यातची आकडेवारी तपासुन माल देणे. आर्थिक व्यवसायात पारदर्शकता यावी म्हणुन करार पद्धतीचा अवलंब करणे आदी सुचना उपस्थित तज्ज्ञांनी मांडल्या. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शेतकर्यांच्या शंकांना उत्तरे देण्यात आली.
औपचारीक सत्रानंतर द्राक्ष, कांदा, डाळिंब, टोमॅटो, मिरची, पॅकेजिंग विषयाशी संबंधित शेतकरी आणि खरेदीदारांची समोरासमोर चर्चा ठेवण्यात आली होती. शेतकर्यांनी खरेदीदारांशी समक्ष चर्चा करून माहिती घेतली.
सत्राचा समारोप करतांना आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे यांनी शेतकर्यांनी व्यवस्थितरित्या खरेदीदाराची माहिती घेऊन मालाची विक्री कराताना कायदेशीर करार करावा, असे सांगितले. खरेदीदारांनी शेतकर्यांच्या मालाला चांगला दर मिळावा यासाठी शेतकर्याना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. गेल्यावर्षी त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा भागातून एक हजार मे.टन आंब्याचे संकलन करण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली.