Breaking News

चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा खून आरोपी पतीला अटक


पाथर्डी प्रतिनिधी ;- तालुक्यातील शिरापूर येथील झोपडपट्टी शिवारात राहणाऱ्या रमेश जाधव याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन खून केला. हिराबाई जाधव (वय ४५) या त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत तो राहत असलेल्या छपराजवळ खड्डा खोदून त्यात पुरले. 
याविषयी माहिती समजताच पोलीस निरीक्षक राकेश मानगवाकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.न मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक यशवंत राक्षे, पोलीस निरीक्षक पुंडलिक पावशे, संभाजी शेंडे, भगवान सानप पोलीस,सुभाष खिळे, हवालदार खाटीक यांनी आरोपी रमेश याला तात्काळ अटक केली. याप्रकरणी मयत हिराबाई जाधव यांचे बंधू संतोष वाघ यांनी फिर्याद दिली. यात म्हटले आहे की, मेव्हणा रमेश जाधव हा माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय तिला घेऊन मारहाण करत होता. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास रमेश जाधव यांच्या बंधूचा फोन आला. त्यांनी सांगितले, की तुमच्या बहिणीला तिच्या नवऱ्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून तिला जीवे ठार मारुन तीला राहत असलेल्या घराजवळ पुरत आहे. त्यानंतर वडिलांना सोबत घेऊन साडे दहाच्या सुमारास शिरापूर येथे गेलो. त्यावेळी तिथे पोलीस ही पोहचले होते व त्यांनी रमेश जाधव यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, या खूनप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे हे करत आहेत.