Breaking News

निरोगी आरोग्यासाठी जॉगिंग ट्रॅक : गडाख


नेवासा शहर प्रतिनिधी ;- शहरातील महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मुक्ताई जॉगिंग ट्रक करण्यात आला. महिलांना निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छ हवा मिळावी, त्यांचे आरोग्य निरोगी रहावे, याच उद्देशाने हा जॉगिंग ट्रॅकचे लोकार्पण करीत आहोत, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती सुनिता गडाख यांनी केले. 
अध्यक्षस्थानी तहसीलदार उमेश पाटील होते. उपसभापती राजनंदिनी मंडलिक, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, पंचायत समिती सदस्य रावसाहेब कांगुणे, विक्रम चौधरी, सविता झगरे, शुभांगी सोनवणे, नगरसेविका श्रीमती फिरोजबी पठाण, योगिता पिंपळे, अंबिका इरले, योगशिक्षक बाळ जाधव, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक लहू जायभाये, गणेश उंडे, आहारतज्ञ डॉ. शरयू कोरडे आदी उपस्थित होते.

गडाख म्हणाल्या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी आहार व कायदेविषयक माहिती देणार आहोत. मुलींच्या भवितव्यासाठी त्यांना स्पर्धा परीक्षेतील भिती दूर व्हावी, यासाठी मार्गदर्शन शिबिरदेखील आयोजित केले आहे. यावेळी यशवंत स्टडी क्लबला महेश मापारी यांच्याकडे पुस्तके सुपूर्त करण्यात आली.

यावेळी तहसीलदार उमेश पाटील, नगर येथील कायझेन अकॅडमीचे प्राचार्य लहू जायभाये, डॉ. शरयू कोरडे, अँड. सोनल पाटील-वाखुरे आदींनी मार्गदर्शन केले. 

यावेळी उषा गडाख, जयश्री गडाख, विशाखा बेल्हेकर, शर्मिला शिंदे, माधुरी कुलकर्णी, शारदा फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती घोलप, अर्चना कुंभकर्ण, अरुणा जगताप, राजश्री आहेर, सीमा गायके, आशा वाखुरे, वैष्णवी गवळी, संगीता चव्हाण, डॉ. नमन शिंदे, अमृता डहाळे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रेखा कु-हे यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले.