हमी भावाने तूर खरेदी होणार : कर्डिले
नेवासा शहर प्रतिनिधी ;- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरु करण्य़ात आलेल्या तूर खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शासनाच्या हमी भावाप्रमाणे तूर खरेदी करण्यात येणार आहे, याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, आवाहन बाजार समितीचे सभापती कडूबाळ कर्डिले यांनी केले.
माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या येथील बाजार समितीच्या आवारात आज {दि. २२} शासकीय हमी भाव तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ सभापती कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसभापती वसंत देशमुख, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, शिवाजी शिंदे, मोहन गायकवाड, राजाराम फोफसे, चंद्रकांत जाधव, श्रीरंग हारदे उपस्थित होते.
तूर देणाऱ्या शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये नोंदणी करावी, त्यासाठी पिकपेरा, सातबारा, आधारकार्ड, बँक पासबुक घेऊन येण्याचेआवाहन सचिव देवदत्त पालवे यांनी केले. एकात्मिक बालविकास प्रकल्प व पंचायत समिती नेवासा यांच्यावतीने किशोरवयीन मुली व महिलांना प्रशिक्षण, स्पर्धा परिक्षा, कायदे विषयक व आऱोग्य या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या सर्व विषयांचा महिलांच्य़ा जीवनात मोठा फायदा होणार असल्याने तालुक्यातील महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सभापती गडाख यांनी केले आहे.