लोणी।प्रतिनिधी - राहाता तालुक्यातील अस्तगावचे माजी उपसरपंच कैलास विठ्ठल जेजूरकर यांचे गुरुवारी {दि. २२} अपघाती निधन झाले. राहता तालुक्यातील नगर-मनमाड रस्त्यावरील निर्मळ पिंपरीच्या टोलनाक्यावर अज्ञात हा अपघात झाला. जेजूरकर यांनी २००७ प्रथम ग्रामपंचायत निवडणूक लढविली. उपसरपंच झाल्यानंतर अस्तगाव नंबर २ सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष झाले. सध्या ते या सोसायटीचे संचालक पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात राहाता पंचायत समितीच्या सदस्या त्यांच्या पत्नी शोभा जेजूरकर, दोन मुले सौरभ जेजूरकर आणि रोहित जेजूरकर असा परिवार आहे. येथील अमरधाम परिसरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उपसरपंच कैलास विठ्ठल जेजूरकर यांचे अपघाती निधन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:30
Rating: 5