Breaking News

विकासासाठी मतभेद सोडून एकत्र या ; निधीची तरतूद करु : आ. मुरकुटे


नेवासा शहर प्रतिनिधी :- शहर विकासासाठी एकत्र या. त्यासाठी लागणारा निधी मी उपलब्ध करून देतो, असे आवाहन आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी यावेळी बोलतांना केले. 
येथील ख्रिश्चन स्मशानभूमीच्या सुशोभिकरण कामाचा शुभारंभ नगरसेविका सुखधान यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्षा संगीता बर्डे, नगरसेविका सीमा मापारी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हिंदू स्मशानभूमी येथील विविध विकासकामांचाही शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुक्तार शेख, अब्बास बागवान, मुन्ना शेख, शफीक जटाली, जैन श्रावक संघाचे विजय गांधी, अमृत फिरोदिया आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना नगरसेवक संजय सुखदान म्हणाले, की विकासासाठी सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. पण याला ‘क्रांतिकारी’ने तिलांजली दिली. तालुक्यातील नेत्यांनी राजकारण करावे. पण स्थानिक कार्यक्रमामध्ये राजकारण नको. शासन त्यांचे आहे, त्यामुळे आ. मुरकुटे निधी आणू शकतात.

यावेळी जगदीश चक्रनारायण, डेव्हिड राक्षे, नगरसेवक सचिन नागपूरे, डॉ. सचिन सांगळे, रणजित सोनवणे, दिनेश व्यवहारे, भारत डोकडे, अल्ताफ पठाण, सचिन वडागळे, राजेंद्र मुथा, राजेंद्र मापारी, विजय कावरे, सतीश गायके आदी कार्यकर्ते, सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.