Breaking News

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण प्रगतिपथावर

रत्नागिरी - मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रत्नागिरी जिल्ह्यातील दुसर्‍या टप्प्यातील परशुराम घाट ते आरवली दरम्यानचे काम वेगाने सुरू झाले आहे. चिपळूण तालुक्यातील दुसरा टप्पा 2019 च्या अखेरपर्यंत पूर्णत्वास जाईल, अशी शक्यता आहे.


मुंबई-गोवा महामार्गाच्या रायगड जिल्ह्यातील पहिल्या टप्प्याच्या कामात अनेक अडथळे व अडचणी येत असल्यामुळे या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. मात्र सरकारने दुसर्‍या टप्प्याचे काम हाती घेतले असून चिपळूण तालुक्यातील परशुराम ते आरवली टप्प्यातील काम महामार्गाच्या दुतर्फा सुरू करण्यात आले आहे. अवघ्या एक महिन्याच्या आत ठेकेदाराने केलेले काम गतिमान असल्याने दुसर्यास टप्प्यातील काम जलद गतीने होईल, अशी आशा आता व्यक्त होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाचे क ाम पुढच्या वर्षाच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वायसन दिले असून सर्वत्र अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार कामाला लागले आहेत. केंद्रीय मत्री अनंत गीते आणि गडकरी यांनी प हिल्या टप्प्यातील अडचणी लक्षात घेऊन दुसर्याा टप्प्यात त्या अडचणीवर मात करून काम कसे पूर्ण होईल, याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. दुसर्‍या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ रत्नागिरी जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी झाला होता. त्याप्रमाणे या कामाला गती आली असून परशुराम ते आरवली हा 38 किलोमीटरचा मार्ग लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.