Breaking News

महापालिकेची 1386 गाळ्यांचा लिलाव करण्यास मंजूरी


सोलापूर ;- महापालिकेच्या मालकीच्या मिनी व मेजर असे 1386 गाळ्यांचा लिलाव करण्यास शासनाने महापालिकेस मान्यता दिली आहे. शासनाच्या आदेशानुसार 30 दिवसांनंतर शासनाची अंतिम मान्यता आल्यावर लिलाव प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. बाजारभावानुसार भाडे आकारणी परवडत नसल्याने व्यापार्‍यांना घेऊन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भेट घेऊ, अशी माहिती नगरसेवक नागेश वल्याळ यांनी दिली .सुनावणी घ्यावी लागेल. शासन आदेशानुसार 30 दिवसांपर्यंत व्यापारी शासनाकडे तक्रार करतील. त्या तक्रारीवर निर्णय घ्यावा लागेल. ते व्यापार्‍यांच्या विरोधात गेल्यावर अपिल करण्याच्या संधीचा फायदा घेतील.