शिर्डी/प्रतिनिधी :- सावळीविहीर येथील समीर गफूर खाटिक {वय ४० } यांचा इलेक्ट्रॉनिक मोटारमध्ये करंट आल्याने जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. खाटीक यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेने सावळीविहीर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस कर्मचारी रावसाहेब शिंदे हे करीत आहेत.
शॉक बसून एकाचा मृत्यू
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:45
Rating: 5
Post Comment