Breaking News

अश्‍व प्रदर्शन हे राज्याचे आकर्षण ठरले : देशमुख


संगमनेर प्रतिनिधी :- तालुक्यातील देवगड येथे होत असलेल्या विविध जातींच्या घोडे प्रदर्शन व स्पर्धेमुळे या यात्रेचा लौकिक राज्यभर वाढला आहे. येथील अश्‍व प्रदर्शन राज्याचे प्रमुख आकर्षण ठरले आहे, असे गौरवौद्गार माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे चिरंजीव, लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी केले.

हिवरगाव पावसा देवगड येथे संगमनेरमधील अश्‍वप्रेमी असोशिएशनच्यावतीने आयोजित भव्य अश्‍वप्रदर्शन स्पर्धेचे उदघाटन देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, आयोजक रणजितसिंह देशमुख, सत्यजित तांबे, डॉ. राजीव शिंदे, अ‍ॅड. माधवराव कानवडे, लक्ष्मणराव कुटे, जि. प. कृषी सभापती अजय फटांगरे, सभापती निशा कोकणे, भाऊसाहेब कुटे, शांताबाई खैरे, मिलिंद कानवडे, अर्चना बालोडे, शरयू देशमुख, सरपंच सुनिता गडाख, दशरथ पावसे, साहेबराव गडाख, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. तुंबारे, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते. या प्रदर्शनात विविध अश्‍वांनी सादर केलेले नृत्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. हजारोंची उपस्थिती ही या स्पर्धेची वैशिष्टे ठरली. 

देशमुख म्हणाले, संगमनेर तालुका हा आ. बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली विकासातून इतरांना दिशादर्शक ठरला आहे. दुष्काळी परिस्थितीतही या तालुक्याने सहकारातून समृद्धी निर्माण केली आहे. स्व.विलासराव देशमुख यांनी लातूर प्रमाणेच संगमनेर तालुक्यावरदेखील प्रेम केले. येथील सहकार व दुग्ध व्यवसायाचे मार्गदर्शन घेऊन आपण लातूरमध्ये काम करणार आहोत. यावेळी रणजितसिंह देशमुख, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, सत्यजित तांबे यांची भाषणे झाली. 

सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. यावेळी बबन शिंदे, रफिक फिटर, उत्तमराव जाधव, मकरंद मुळे, सुभाष आहेर, गणेश गुंजाळ, डॉ. प्रमोद पावसे, तुकाराम पावसे, चांगदेव गडाख, कैलास दिवटे, रामनाथ गडाख, मथाजी पावसे, बाळासाहेब शिंदे, रमेश गुंजाळ, संतोष हासे, मोहन करंजकर, बाळासाहेब मोरे, रोहिदास पवार, दत्तु खुळे, विलास कवडे, विजयराव देशमुख, संजय गोरे, प्रदीप राठोड, प्रशांत धार, अनिल पाटील, श्रीनिवास शेळके, सर्जेराव मोरे, राकेश गोयल, बादल शेख, हौशीराम सोनवणे, नानासाहेब शिंदे, माणिक यादव, सुरेश शिंदे, निखील पापडेजा, बाबासाहेब गायकर, रमेश नेहे, अभिजीत ढोले, विष्णू राहटळ, सुभाष सांगळे आदी उपस्थित होते. अजय फटांगरे यांनी आभार मानले.