खेडला वाळु माफियांवरील कारवाईत जेसीबी जप्त
कुळधरण/प्रतिनिधी/- कर्जत तालुक्यातील खेड नजिकच्या भीमा नदीपात्रातुन होत असलेल्या वाळु उपशावर कर्जतच्या महसूल विभागाने कारवाई केली. कारवाईत एक जेसीबी जप्त करण्यात आला.प्रांताधिकारी अर्चना नष्टे स्वतः या कारवाईत सहभागी झाल्या. शनिवारी,३ फेब्रुवारी च्या पहाटे अडीचच्या सुमारास महसूल विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
खेड येथील भीमा नदी पात्रातुन खुलेआम वाळु उपसा होत होता. महसुल विभागाने वेळोवेळी कारवाया केल्या. मात्र वाळु तस्कर कारवाईला न जुमानता वाळु उपसा सुरुच ठेवीत असल्याने महसुल विभागाने रात्रीतुन ही कारवाई केली. वाळू उत्खनन करत असलेला एक जेसीबी महसूल कर्मचाऱ्यांनी कारवाईत जप्त केला. कारवाईत तलाठी मोहसिन शेख, विश्वास राठोड, रवी लोखंडे, गणेश सोनवणे, नंदकुमार गव्हाणे आदी सहभागी झाले होते. या पुर्वी बाभुळगाव दुमाला येथील कारवाईत एक जेसीबी जप्त केलेला असल्याची माहिती तलाठी नंदकुमार गव्हाणे यांनी दिली. महसूल विभागाने खेड येथे केलेल्या कारवाईचे सोशल मिडियातुन कौतुक केले जात आहे
