Breaking News

खासदार गांधी कोमात; डॉ. सुजय विखे जोमात छिंदम प्रकरणानंतर गांधींच्या समस्येत वाढ

अहमदनगर/प्रतिनिधी। दक्षिन नगर जिल्हा काबीज करायचा यासाठी डॉ.सुजय विखे पाटील यांनी सुरु केलेल्या तालुका मेळाव्यातुन आगामी लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु केली असतानाच या मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. 

गांधी समर्थक श्रीपाद छिंदम याचे वादग्रस्त प्रकरण घडल्यानंतर खासदार गांधी यांच्या बंगल्याच्या अतिक्रमणाचा विषय ऐरणीवर आला. त्यानंतर दोन दिवस उलटत नाही तोच आता खासदार दिलीप गांधी पिता - पुत्रा विरुध्द अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटना खा.दिलीप गांधी यांच्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वाटेतील काटे ठरण्याची चिन्हे आहेत. तर दुसर्‍या बाजुला डॉ.सुजय विखे यांची मोर्चेबांधणी सुरु झाल्याने दक्षिणेत काँग्रेसचे वजन वाढणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

डॉ.सुजय विखे हे जरी सांगत असले की, मी कोणत्याही पक्षाचा नाही तरीही त्याच्या मागे निश्‍चित काँग्रेसची ताकद आहे. हे कोण्या भविष्यकाराने सांगण्याची गरज नाही. भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी या मतदार संघात आपला ठसा उमटवला होता. याच मतदार संघात सुजय विखे पाटील हे देखील आपले नशिब आजमावणार असल्याची चर्चा सध्या जिल्हयात सुरु होती त्यातच आता त्यांनी जिल्हयातील उत्तर भागात आपला ठसा उमटविण्यासाठी आणि यामतदार संघात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहे. यातुन सुजय विखे पाटील यांनी आता निवडणुकीच्या प्रचारालाच सुरवात केली असल्याचे बोलले जात आहे.


डॉ. सुजय विखे पाटील दक्षिण दौर्‍यावरडॉ. सुजय विखे पाटील यांनी दक्षिण मतदार संघात विविध कार्यक्रमांचा धडका लावला असून यातून त्यांनी एक प्रकारे विधानसभेची सुरुवात केली असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी मुदतपूर्व निवडणुका होणार, असे बोलले जात होते. मात्र आता हे चित्र बदलले असून दक्षिण मतदार संघात त्यांनी विविध कामांसाठी दौरे सुरु केले असून या आठवड्यात त्यांनी दक्षिणेतील विविध ठिकणी पिंजून काढल्याचे सर्वांनीच पाहिले आहे.


विद्यमान खासदारांच्या अडचणीत भरचभारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या अडचणीत सध्या वाढ होत चालली असून दोन दिवसापूर्वी त्याचा समर्थक याने शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याने गांधी यांच्यावर टिका झाली होती. तर शनिवारी खा.दिलीप गांधी यांच्यासह इतर तिघांवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातुन आता खा.गांधींच्या अडचणीत भरच पडत चालली असल्याचे चित्र आहे.