Breaking News

महामार्गावर लुटमार करणार्‍या टोळीचा म्होरक्या ताब्यात


रस्त्यावर लुटमार करणार्‍या टोळीचा म्होरक्यास ताब्यात आले. परंतू त्याचे दोन साथीदार पसार झाले.
मिरजगांव पोलिस दूरक्षेत्रात शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली की, कर्जत तालुक्यातील ज्योतीबावाडी शिवारात मालवाहतूक ट्रका आडवून लुटण्याचा प्रकार सुरू आहे. यावेळी मिरजगांव पोलिस दुरक्षेत्राचे पो. हे. काँ. प्रल्हाद लोखंडे, पो.काँ. सुरेश बाबर, पो. काँ. बबन दहीफळे, पो. काँ. दत्तात्रय कासार, इंगावले, काळांदे गणेश, सरोदे जितेंद्र, रमेश घोडके यांनी सापळा रचून एका खाजगी वाहनातून घटना स्थळाकडे तातडीने पाचारण केले असता दुचाकीवरून आलेल्या तिघांनी ज्योतीबावाडी शिवारातील कंठेश्‍वर( कठिणदेव) मंदिराजवळ दुचाकी एका मालवाहतूक गाडीला अडवी उभी करून मालट्रक लुटण्याचा प्रकार सुरू असतानाच मिरजगांव पोलिस त्याठिकाणी पोहोचले खाजगी वाहनातून आलेले लोक खाली उतरतांना पाहून पोलीस असल्याचा अंदाज घेत लुटेरे पळून जावू लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, परंतू रात्रीच्या अंधारात व आजुबाजूच्या माळराणाचा फायदा घेत पसार झाले. मात्र त्यातील एकास गजाआड करण्यास यश आले. तर दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. यावेळी पकडलेल्या गुन्हेगार दादा सुर्यभान ठोंबरे (वय 26) राहणार वडगांव तांदळी, ता. जि. अहमदनगर याचेकडून एक तलवार तसेच एम.एच. 16 ए.डब्ल्यू 8856 क्रमांकाची दुचाकी हस्तगत केली आहे. तर मोहन उर्फ मुक्या बाबासाहेब सुंभे आणि विकास उत्तम ठोंबरे हे दोघेही राहणार वडगांव तांदळी येथील असुन ते पसार झाले आहेत. पुढील तपास कर्जतचे पोलिस निरीक्षक वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे. काँ. प्रल्हाद लोखंडे व सुरेश बाबर करत आहेत.