Breaking News

पीएनबीतील दहा हजार कार्डांची माहिती चोरीला


मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार कोटींचा चुना लावून नीरव मोदी फरार झाल्यानंतर पीएनबीतील दहा हजार क्रेडिट व डेबिट कार्डांची माहिती चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. ‘एशियन टाईम्स’ या हाँगकाँग वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. यामुळे या सर्व कार्डधारकांची वैयक्तिक माहिती सायबर चोरांच्या हातात पडली असून ही माहिती ह ॅकर्सकडून विकली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. पीएनबीच्या कार्डधारकांची वैयक्तिक माहिती गेल्या तीन महिन्यांपासून इंटरनेटवर उपलब्ध होती, असाही गौप्यस्फोट वरील प्रसारमाध्यमाने केला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या कार्डधारकांची वैयक्तिक माहिती चोरीला जात आहे किंवा गेली आहे हे सर्वप्रथम सिंगापूर येथील ‘क्लाऊडसेक इन्फर्मेशन सिक्मयुरिटी’ या संस्थेच्या लक्षात आले.