Breaking News

मला निवडणुक लढविण्यात रस नाही - सुरेशदादा जैन

जळगाव, दि. 01, फेब्रुवारी - जळगाव शहरातील जवळपास 18 मार्केटच्या मुदत संपलेल्या गाळे प्रकरणात कुठलेही राजकारण मला करायचे नसून, तुम्ही आमदार सुरेश भोले यांना जाऊन भेटा, असा सल्ला माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी गाळेधारकांना आज दिला. यासोबतच मला यापुढे निवडणुकच लढवायची नसल्याची स्पष्टोक्ती माजी मंत्री सुरेश जैन यांनी गाळेधारकांशी चर्चा करतांना केली.


जळगाव महापालिका मालकीच्या मार्केटमधील 2387 गाळेधारकांघ्या भाड्याच्या मुदती संपल्या आहेत. या गाळेधारकांना महापालिका प्रशासनाने बीले वितरीत केली आहेत. ही बीले अवाजवी असल्याचे सांगत 18 मार्केटमधील गाळेधारक यावर सकारात्मक तोडगा काढण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री सुरेश जैन यांच्या 7 शिवाजी नगर येथील निवासस्थानी आले होते. यावेळी या गाळेधारकांनी सुरेश जैन यांना तुम्हीच आम्हाला या संकटातून काढून शकता, मागचे सगळे विसरा असे म्हणत गाळेप्रश्‍नी हस्तक्षेप करण्याची विनंती केली. काही जणांनी यात राजकारण करण्याचा प्रयत्न केला असेल मात्र, आजपर्यंत तुम्ही आमचे नुकसान होवू दिले नाही असेही या गाळेधारकांनी सुरेश जैन यांना सांगितले. गाळेधारकांना उत्तर देतांना जैन यांनी सांगितले की, माझ्या हातात होते तितके मी केले आहे. आता माझ्या हातात काही नाही, असेही जैन यांनी सांगितले.