Breaking News

एक गाव एक शाळामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरणार


सिंधुदुर्ग, दि. 01, फेब्रुवारी - प्रति वर्गास एक शिक्षक याप्रमाणे एक गाव एक शाळा योजनेच्या प्राथमिक माहितीत अनेक शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याची बाब समोर आली आहे. मुलांना वाहतूक भत्ता देऊनही शिक्षकांच्या वेतनापोटीचे शासनाचे करोडो रुपये वाचणार आहेत. याबाबतचा परिपूर्ण आराखडा 10तारीखपर्यंत सादर करुन 15 फेब्रुवारीच्या शिक्षण समितीच्या खास सभेत तो सादर करण्याचे आदेश शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ यांनी दिले.जिल्हा परिषद शिक्षण समितीची मासिक सर्वसाधारण सभा जि.प. शिक्षण समिती सभापती प्रीतेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.