Breaking News

श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी उत्साहात


श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी राहुरीत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संत नरहरी महाराज यांच्या मुर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.भैरवनाथ मंदिर येथे सकाळी नरहरी महाराज यांच्या मुर्तीला अभिषेक संंपन्न झाला. पुजा झाल्यानंतर मुर्तीची शहरात मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी पारंपारिक फुगडी खेळत फेर धरला. यावेळी फटाक्यांची मोठ्या आतिषबाजी करण्यात आली. नरहरी महाराज मंदिरात बाळकृष्ण महाराज कांबळे यांचे काल्याचे किर्तन झाले, कार्यक्रमात ह.भ.प. सिताराम महाराज सोनार, हरिभाऊ बुर्‍हाडे, तसेच भाविक सहभागी झाले. राहुरी तालुका सराफ संघटना, कारागीर संघटना, सुवर्णकार, बंगाली कारागीर, गलाई आटणीवाले संघटना पुण्यतिथी सोहळ्यात सहभागी झाले होते. रविवारी सुरुची भोजन आयोजित करण्यात आले आहे.