Breaking News

खेळामुळे पराजय करण्याची शक्ती : दवणे


अहमदनगर : प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर दिव्यांग व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. आपण दिव्यांग आहोत, याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीकडे लक्ष द्या. वेळ ही वाहत्या पाण्यासारखी आहे. यामुळे प्रत्येक क्षणांचा विद्यार्थ्यांनी आनंद घ्यावा. विद्यार्थ्यांना पराजय सहन करण्याची शक्ती खेळ देत असतो, असे मत दिव्यांग खेळाडू शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त विलास दवणे यांनी व्यक्त केले.
न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी विलास दवणे बोलत होते. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्रद्धा घुले, कार्यक्रमाच्या अध्यक्षा अ‍ॅड. दीपलक्ष्मी म्हसे, नंदकुमार झावरे, जी. डी. खानदेशे, रा. ह. दरे, सिताराम खिलारी, निमा काटे, प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, क्रीडा संचालक प्रा. डॉ. शरद मगर, प्रा. सुधाकर सुंबे, प्रा. धन्यकुमार हराळे, प्रा. धनंजय लाटे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संगीत विभागाच्या स्वागत गिताने करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक प्राचार्य डॉ. बी.एच. झावरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अर्चना रोहोकले यांनी केले. प्रा. एन. व्ही. काळे यांनी आभार मानले.